User talk:Vidhin Kamble

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
Welcome to Wikimedia Commons, Vidhin Kamble!

-- Wikimedia Commons Welcome (talk) 17:26, 28 October 2017 (UTC)[reply]

Location?[edit]

Hello Vidhin - thanks for adding your very nice photos to Commons! Could you add the locations where the photos were taken, please, as this increases their scientific value a lot. Thanks! - MPF (talk) 18:42, 25 November 2018 (UTC)[reply]

तांबट पक्षी Coppersmith Barbet[edit]

तांबट इंग्रजी नाव Coppersmith Barbet शास्त्रीय नावः Megalaima haemacephala indica) तांबट पक्ष्याचे वास्तव्य भारतीय उपखंड व दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांत आढळतो. हा येथील कायमचा रहिवाशी आहे. शेतात व बागेतील वृक्षांवर तसेच विरळ झाडीच्या प्रदेशातही तो आढळतो. हिमालयात हा पक्षी तीन हजार फुटांपर्यंत आढळतो. शुष्क वाळंवटी प्रदेशात मात्र हा पक्षी आढळत नाही. हा भारतात सर्वत्र आढळतो. अर्थात हा अगदी सहज नजरेत येत नाही कारण ह्याच्या रंगामुळे हा हिरव्या झाडांमध्ये सहज दडून बसतो. हा पक्षी दिसण्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्याची ओरडण्याची पद्धत. तांब्याच्या भांड्यावर घाव घातल्यावर येणाऱ्या आवाज सारखा आवाज करून आपले लक्ष वेधून घेतो या हिरव्या पक्ष्याच्या गळयाजवळ व कपाळावर लाल ठिपका असतो. गळा पिवळा व पोटाखालचा भाग हिरवट पिवळसर असतो. चोच चिमणीच्या चोचीपेक्षा जाड असते. त्याच्या नाकाजवळ आणि चोचीच्या बुडाजवळ तुरळक जाड केस मिशांसारखे डोकावत असतात. फ्रेंच भाषेत दाढीला बार्बेट म्हणतात व त्यावरूनच त्याला इंग्रजी भाषेत 'बार्बेट' हे नाव मिळाले आहे. त्याला कॉपरस्मिथ असेही म्हणतात. त्याचं सरळ भाषांतर ताबंट असे होतं. ताबंट लोक हातोडयाने पत्रा ठोकताना जसा आवाज होतो तशा आवाजात हा पक्षी आवाज करायला लागतात. दक्षिण भारतात तांबट पक्ष्याचे चार प्रकार दिसून येतात. तपकिरी डोक्याच्या तांबट (Brown headed barbet) या पक्ष्याचे डोके, छाती, कंठ तपकिरी रंगाचे असतात. पांढऱ्या गालाच्या तांबट पक्ष्याच्या (White-cheekeel barbet) डोळ्यांची वरची कडा आणि गाल हे पांढऱ्या रंगाचे असतात. किरमिजी रंगाच्या तांबट पक्ष्याच्या (Crimson fronted barbet) गळ्यावर व छातीवर किरमिजी रंग असतो व त्यामागे अनुक्रमे काळा आणि निळा पट्टा असतो. वसंत ऋतूत त्याची लगबग आणि प्रियाराधन चालू असतं म्हणूनच हिंदी भाषेत त्याला 'छोटा बसंत' म्हणतात. मृत झाडांवर वा झाडांच्या मृत खोडांवर हे पक्षी पोकळी करून राहतात. सुतारपक्ष्याप्रमाणेच ताबंटही झाडाला रूपयाएवढे भोक पाडून घरटं तयार करतो. झाडावर 'टॉक-टॉक' असा आवाज आल्यास समजावे की, आपल्या जवळपास तांबट घरटे बनवत आहे. काही लोक याला सुतार पक्षीसुद्धा समजतात. पण दोघेही वेगवेगळे आहेत. मऊ लाकूड असलेल्या झाडाची एखादी वठलेली फांदी तो हुडकून काढतो. पिपंळ, सावर, गुलमोहर, आंबा, चिंच वा शेवग्याचे झाड त्याच्या पसंतीला येते. साधारणपणे जमिनीपासून १०/१२ फुटांवर फांदीच्या खालच्या बाजूची जागा घरटयासाठी निवडली जाते. नरमादी जोडीने लाकूड पोखरण्याचे काम करतात. जुन्या घरट्याचा वापर ते करताना आढळतात. किंवा दर वेळी नवीन घरटे जोडीने बनवत असतात. तांबट पक्षी प्रामुख्याने फळे खातो.. अंजीर, उंबर, वड-पिंपळाची फळे तो आवडीने खातो. त्याला रसयुक्त फळे आवडतात. तसेच ठरावीक फुलांच्या पाकळ्याही खातो. त्याचबरोबर तांबट पक्षी काही ठरावीक कीटकही खातो. तांबट आपल्या शरीराच्या दीड ते तीन पट फलाहार करतो असे आढळून येते. तांबट पक्ष्यांचा विणीचा हंगाम जानेवारी ते जून असतो. मादी ३ ते ४ पांढरी स्वच्छ अंडी घालते. साधारणतः २ आठवड्यात पिले अंड्यातून बाहेर येतात. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी आळीपाळीने करतात.

(२०११ मध्ये तांबट पक्ष्याला मुंबईचा प्रमुख पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली). — Preceding unsigned comment added by Vidhin Kamble (talk • contribs) 06:00, 28 November 2018 (UTC)[reply]

सुगरण / बाया पक्षी Weaver Bird, Baya bird शास्त्रीय नाव : Ploceus philippinus[edit]

सुगरण / बया पक्षी

इंग्रजी नाव : Weaver Bird, Baya bird शास्त्रीय नाव : Ploceus philippinus

अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला!’ वरील कवितांच्या या ओळी बहिणाबाई यांनी सुगरण पक्ष्याच्या घरट्याचे वर्णन करणाऱ्या सुंदर कवितेतील आहेत. हे आपल्याला माहित आहेच. अत्यंत सुंदर, बारकाईने आणि काळजीने घरटे बनवणारा हा पक्षी म्हणजे सुगरण. सुगरण हा पक्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इ. देशांत आढळतो. हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी काही उपजाती स्थलांतर करणाऱ्या आहेत. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत. पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण वगैरे. पण या सर्वांत बाया हा सर्वात जास्त आढळणारी उपजात आहे. सुगरण पक्ष्यांचे थवे कापणी झालेल्या शेतात आणि शेतीभोवतालच्या प्रदेशांत नेहमी आढळतात. तसेच तलावांच्या काठावरील झुडपांत किंवा लव्हाळ्यांच्या बेटांत हे रात्री विश्रांती घेतात. लहान किडे, धान्य, फ़ळं नी गवतांच्या बियांच्या जोडीला कधीमधी फ़ुलपाखरं, बेडकाची लहान पिल्लं, लहानसहान पालीपण खातात. पावसाळा सुरू झाला की बया नराचा नूर पालटून जातो. एखाद्या नवरोबासारखा अंगावर हळद लावावी त्याप्रमाणे त्यांचं डोकं आणि गळयाखालचा भाग पिवळा होतो. नर व मादी या दोघांचाही रंग पिंगट-तपकिरी असून पंख आणि शेपटी गडद तपकिरी रंगाची; खालचा भाग पिंगट; चोच जाड व निमुळती असते. उन्हाळ्यात नराच्या डोक्याच्या दोन्ही बाजू , हनुवटी व गळा काळसर-तपकिरी रंगाचा आणि छाती व डोक्याचा उरलेला भाग चकचकीत पिवळा होतो. मात्र विणीचा हंगाम सरल्यावर नर-मादीचा रंग अगदी चिमणी सारखा होतो. मे ते सप्टेंबर हा याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो. सुगरण पक्ष्यांचे घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, म्हणूनच त्या पक्ष्याला सुगरण हे नाव मिळालेलं आहे. गवताच्या लांब लांब काडया चोचीने खुडून झाडावरती पक्की जागा हेरून तो घरटं बांधायला सुरवात करतो. नारळाच्या पानाचेच सोपट वापरलेलं जाते. चोचीने गवताची काडी खालीवर गुंफत तो हे काम करतो. खालच्या बाजूला ते घरटं पुंगीसारखा गोल आकार धारण करतं. गोल फुगवटयाची जागा अंडी ठेवण्यासाठी त्या बाजूला कापूस किंवा मऊ पदार्थ ठेवला जातो. वा-याने घरटं हलू नये म्हणून आत मातीचे गोळे ठेवून ते जड केलं जातं. असे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी झाडाला टांगलेले असते. कधी-कधी बाभळीच्या झाडावर अगदी उंच फांदीच्या टोकाला कधी ३० ते ४० घरटी आपणाला पहावयास मिळतात. एकावेळी ४ ते १० अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर घरट्यांच्याजवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो. सुगरण पक्ष्याच्या मादीला घरटे निवडण्याचा अर्थात वर निवडण्याचा अधिकार दिला आहे. नराने बांधलेलं घर आर्किटेक्टनं तपासावं तशी ती पहाणी करते. घरटे आकर्षक व सुरक्षित वाटले तर नर मादीचं मीलन होतं मग यापुढची सारी कामे म्हणजे अंडी घालणं ती उबवणं ही कामं मादीला करावी लागतात. एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसऱ्या मादीला बोलाविण्यासाठी परत गाणी म्हणतो. नर सुगरण एकावेळी एकपेक्षा जास्त मादींचा "दादला" असतो. पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी जर एकही घरटे मादीला पसंत पडले नाही तर नर ते झाड किंवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरू करतो. विणीच्या हंगामात मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते. — Preceding unsigned comment added by Vidhin Kamble (talk • contribs) 18:24, 27 February 2019 (UTC)[reply]

And also:

4nn1l2 (talk) 12:10, 21 June 2019 (UTC)[reply]

Community Insights Survey[edit]

RMaung (WMF) 00:56, 10 September 2019 (UTC)[reply]

Reminder: Community Insights Survey[edit]

RMaung (WMF) 15:17, 20 September 2019 (UTC)[reply]

Reminder: Community Insights Survey[edit]

RMaung (WMF) 19:55, 3 October 2019 (UTC)[reply]